Abhinay Berde| लोकप्रिय अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या अभिनयाने सर्वांचे मनोरंजन केले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत लक्ष्मीकांत बेर्डे यांचा लेक अभिनयने देखील मनोरंजनसृष्टीत पदार्पण केले. ‘ती सध्या काय करते’ हा अभिनय चित्रपट खूप गाजला. यानंतर तो अनेक सिनेमांमध्ये झळकला. यानंतर आता अभिनय रंगभूमी गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.
अभिनय बेर्डे लवकरच रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. अभिनय ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकातून मराठी रंगभूमीच्या मंचावर पाऊल ठेवणार आहे. याबाबत पोस्ट शेअर करत त्याने चाहत्यांना माहिती दिली आहे. “तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमाने आणि आई-बाबांच्या आशीर्वादाने आज नाटकात पहिलं पाऊल टाकतोय! माझं पाहिलं व्यावसायिक मराठी नाटक, आज्जीबाई जोरात!”, असं म्हणत त्याने पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या पोस्टवर चाहत्यांबरोबरच अनेक सेलिब्रिटींनीही कमेंट करत अभिनयला शुभेच्छा दिल्या आहेत. आज्जीबाई जोरात हे पहिलं AI महाबालनाट्य आहे. क्षितीज पटवर्धनने हे नाटक लिहिलं आहे. ३० एप्रिलपासून या नाटकाचे प्रयोग होणार आहेत.
View this post on Instagram
अभिनय बेर्डेचं हे नाटक आजच्या तरुण पिढीच्या आणि त्यांच्या पालकांशी निगडित विषयावर असणार आहे. त्याचे हे पहिले नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन क्षितिज पटवर्धन याने केले आहे. ‘आज्जीबाई जोरात’ या नाटकात अभिनय बेर्डे, जयवंत वाडकर, मुग्धा गोडबोले, निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.
अभिनयच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने ‘बांबू’, ‘बॉइज ४’, ‘अशी ही आशिकी’, ‘मन रे कस्तुरी’, ‘रंपाट’ या सिनेमांमध्ये काम केले आहे. आता लवकरच तो रंगभूमीवर पदार्पण करणार आहे.
हेही वाचा: