Batool Zehra ram bhajan : जम्मू-काश्मीरमधील मुस्लिम विद्यार्थिनी सैयद बतूल जहराने अलीकडेच तिची मातृभाषा पहाडीमध्ये राम भजन गायले आहे. विद्यार्थिनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. युजर्स तिचे खूप कौतुक करत आहेत. बतूल ही उत्तर काश्मीरमधील उरी भागातील असून ती कॉलेजच्या पहिल्या वर्षात शिकत आहे.
सर्जिकल स्ट्राईकसाठी ओळखले जाणारे उरी आता राम भजनासाठी ओळखले जाते. बतुलच्या या 52 सेकंदांच्या व्हिडिओमुळे उरी उरी हे ठिकाण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. व्हिडिओमध्ये विद्यार्थिनीने म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 दिवस उपवास करत आहेत. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या उदात्त हेतूने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सैयद पुढे म्हणते, आज संपूर्ण देश राम नामाने गुंजत आहे. अशात जम्मू-काश्मीरही यात सामील झाले आहे. त्यानंतर सैयदने आपलय खास शैलीत राम भजन गायले आहे.
सैयदचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर ती म्हणाली, ‘मी जुबिन नौटियालचे गाणे ऐकले आणि मला ते खूप आवडले. मला वाटलं ते हिंदीत असू शकतं तर पहाडीत का नाही. मग ते पहाडीमध्ये लिहिले आणि गायले गेले. मी ते रेकॉर्ड केले आणि माझ्या हेडला दाखवले. त्यांनी ती पोस्ट केली आणि ती व्हायरल झाली”
जम्मू काश्मीरमधील मुस्लिम विद्यार्थिनीने खास पहाडी भाषेत गायले राम भजन#RamMandir #Ayodhya #rambhajan #viralvideo pic.twitter.com/mcjSauT3Mm
— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) January 15, 2024
उत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू आहे, ज्यात सर्व स्तरातील मान्यवर आणि लोक उपस्थित राहणार आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने 22 जानेवारी रोजी दुपारी राम मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाला प्रतिष्ठित करण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्येत रामलल्ला यांच्या अभिषेक सोहळ्यासाठी वैदिक विधी 16 जानेवारीपासून म्हणजेच एक आठवडा आधी सुरू होणार आहेत.