पिंपरी, {आलोक कुमार}(प्रतिनिधी) – भारतातील औद्योगिक सांख्यिकी मुख्य स्त्रोत म्हणून उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण महत्त्व असून सर्वेक्षणाद्वारे संकलित केलेली माहिती सांख्यिकीय कारणांसाठी वापरली जाते. तसेच सकल देशांतर्गत उत्पादनात औद्योगिक क्षेत्राच्या योगदानाचा अंदाज लावणे आणि औद्योगिक विकासासाठी धोरणे तयार करण्यात याचा वापर केला जातो, असे राष्ट्रीय प्रतिदर्श सर्वेक्षण कार्यालय संचालक आणि पुणे विभागीय प्रमुख आलोक कुमार यांनी सांगितले.
भारत सरकारच्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय, फिल्ड ऑपरेशन विभाग क्षेत्रीय कार्यालय पुणे यांच्या वतीने गुरुवारी (दि. २२) उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण रिटर्नचे स्व-संकलन करण्यासाठी शिबिराचे आयोजन केंद्रीय सदन, आकुर्डी येथे झाले. शिबिराचे उद्घाटन आलोक कुमार यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी उपसंचालक नरेश पाटील, वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी महेश चोरघडे यांनी मार्गदर्शन केले.
नरेश पाटील यांनी सर्वेक्षणसाठी कारखान्यांकडून सहकार्याच्या महत्त्व आणि सहभागींना वेळेत रिटर्न स्वयं-संकलन करण्यासाठी माहिती दिली. महेश चोरघडे यांनी स्वयं-संकलन प्रक्रियेची माहिती व प्रशिक्षण दिले. विविध कारखान्यांच्या प्रतिनिधींनी शिबिरात सक्रिय सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी गरिमा सिंग यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी महादेव कुलाळ व आनंदसागर रोटे यांचे सहकार्य केले.