वीसगाव खोरे, (वार्ताहर) – बालवडी (ता.भोर) जिल्हा परिषदेच्या शाळेत पुस्तकांची गुढी उभारुन नवीन वर्षाचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापक भिमराव शिंदे सहकारी शिक्षक महादेव बदक, आनंदा सावले अंजना कोंढाळकर, आणि विद्यार्थी यांच्या संकल्पनेतून ही पुस्तक गुढी उभारण्यात आली.
पुस्तकांच्या गुढी समोर दीप्रज्वलन आणि गुढीला पुष्पहार अपर्ण करण्यात आला. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी ही या पुस्तकांच्या गुढीचे पूजन केले. २५१ पुस्तकांची गुडी उभारून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज, साने गुरुजी, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची वैचारिक मीमांसा करणारी पुस्तके,संत कबीर, रविदास,तुकाराम ज्ञानेश्वर, नामदेव तुकडोजी महाराज आदी संत साहित्य, विश्वकोश आणि संस्कृती कोष , बखर, बुद्ध, सानेगुरूजी, क्रांतिसिंह नानापाटील,भगत सिंग, पंडीत जवाहरलाल नेहरू, लिंकन आदींची पुस्तकांचा समावेश आहे.
वाचनाने ज्ञान मिळते जीवन समृध्द होते विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी.वाचन संस्कृती रुजावी आणि वाढावी ज्ञानाचा उत्सव व्हावा यासाठी ही पुस्तक गुढी उभारली असल्याचे राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक मुख्याध्यापक भिमराव शिंदे यांनी सांगीतले.
गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे ,गटशिक्षण अधिकारी राजकुमार बामणे ,विस्तार अधिकारी शिवाजी खोपडे केंद्रप्रमुख प्रभावती कोठावळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापू निकम यांनी या उपक्रमाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.