वीसगाव खोरे, (वार्ताहर) – बाजारवाडी (ता.भोर) येथे विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या हेतुने शालेय व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. अंगणवाडी तसेच इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता.
ग्रामीण भागातील पारंपरिक जीवनशैली विषयी महाराष्ट्राची लोकधारावर आधारित गीतांचा कार्यक्रमाचं उद्घाटन सरपंच रुपाली जाधव, उपसरपंच उत्तम खोपडे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी वेगवेगळी समाजप्रबोधनपर, कौटुंबिक जीवनावर आधारित, जगाचा पोशिंदा बळीराजा,आई, ईश्वर भक्ती, शौर्य, देशप्रेम, देशभक्तिपर गीते व हिंदी-मराठी गाण्यांवर २१ नृत्य व नाटिका सादर केल्या.
गणेश वंदना,आमच्या पप्पांनी गणपती आणला या गीताने सुरुवात करण्यात आली. स्वागत गीत,वासुदेव आला, मंगळागौर,मावळ जागं झालं रं,मेरे पापा बालवाडी, विनोदी गीत सख्खी सासु गेली, मेरे घर श्रीराम आयेंगे,आला बैलगाडा,पाटलांचा बैलगाडा,बायपण भारी देवा,स्कूल चले हम,धनगरी नृत्य, पोलीसवाल्या सायकल वाल्या, नववारी साडी, दादा कोंडके फ्युजन सॉग्स,करंट लगा,गुलाबी शरारा, या या मायाया,एकपात्री नाटक झाशीची राणी या गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केले.
या प्रसंगी गोरख मानकर, तुषार शिंदे, शंकर शिंदे, एकनाथ धावले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वप्निल वाघ, योगेश गुरव, सदस्य नीलम शिंदे, मुक्ता राऊत, मंगल धावले, बाळू सपकाळ, संपत मानकर, कविता भागवत,रुपाली शिंदे, संदीप धावले, गोविंद खोपडे, शिक्षक सुरेश खोपडे, सुदेश पाटील, भारती पिंगट, स्वाती चव्हाण, महिला वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.