Raipur News – छत्तीसगडमधील रायपूर रेल्वे स्थानकावर शनिवारी रेल्वे संरक्षण विशेष दलाच्या एका जवानाच्या रायफलमधून अपघाताने झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आणि एक प्रवासी जखमी झाला.
एका उपनिरीक्षकाच्या नेतृत्वाखालील आरपीएसएफ चे पथक एस्कॉर्ट ड्युटीनंतर सारनाथ एक्सप्रेस ट्रेनमधून उतरत असताना सकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली, असे येथील अधिकाऱ्याने सांगितले.
कॉन्स्टेबल दिनेश चंद्र (वय ३०) हे रेल्वेच्या एस-२ डब्यातून बाहेर पडत असताना त्यांचे सर्व्हिस वेपन चुकून निसटले आणि त्यातून त्यांच्या छातीत गोळी लागली. वरच्या बर्थवर झोपलेल्या मोहम्मद दानिश नावाच्या एका प्रवाशाच्याही पोटात गोळी घुसली आहे.
दोघांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले, तेथे कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितले. मृत जवान राजस्थानचा रहिवासी होता, अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.