धुळे : धुळ्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. धुळ्यातील मोरशेवडीमध्ये विहिरीचा काही भाग कोसळून मुलगा आणि आईचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे आहे. ही घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनासह ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मृतदेह बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले.
शेतातील विहीर बघण्यासाठी गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जाते आहेत. सुनीता पवार, आणि शाम पवार,असे मृत झालेल्या मायलेकांची नावं आहेत. ते नांदगाव तालुक्यातील रहिवासी आहेत. नुकतेच मोरशेवडी येथे ते नातेवाईकांकडे आले होते. मात्र यावेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेने आई आणि मुलाचा जीव घेतला आहे. त्यामुळे संपूर्ण गावाता हळहळ व्यक्त केली जात आहे.
धुळे तालुक्यातील मोरशेवडी येथे शेतात विहीर बघण्यासाठी गेलेल्या दोघे मायलेक गेले होते. त्यावेळी विहिरीचा भाग कोसळून ढिगाऱ्याखाली अडकले गेले आणि त्यातच गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दिलीप खीरा जाधव यांच्या विहिरीचे काम शेतात चालू होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. दोघाही मृत मायलेकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी दुपारी उशिरापर्यंत काम सुरु होते. मायलेकाच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.