मुंबई : अभिनेत्री केतकी चितळे तिच्या सोशल मीडियाच्या पोस्ट मुळे पुन्हा एकदा वादात अडकली आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांवर आक्षेपार्ह भाषेत लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. या प्रकरणी तिच्याविरोधात पोलिसांत गुन्हा देखील दाखल झाला आहे. यावरुन आता राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे ट्विट करत केतकी चितळेला सल्ला दिला आहे.
डाॅ. अमोल कोल्हे यांनी ट्विट केले आहे की,’साहेबांबद्दल द्वेषाने गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध! महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या जडणघडणीत कृषी, सहकार, उद्योग, सामाजिक समतोल, महिला धोरण अशा अनेक क्षेत्रांत आदरणीय शरद पवार साहेबांचं मोलाचं योगदान आहे. विखारी आकसापोटी अशी गरळ ओकण्याआधी साहेबांनी महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचा स्वतःला अभिनेत्री म्हणवणाऱ्यांनी अभ्यास करावा.’ असं म्हणत कोल्हे यांनी सल्ला दिला आहे.
साहेबांबद्दल द्वेषाने गरळ ओकणाऱ्यांचा जाहीर निषेध!🏴
महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या जडणघडणीत कृषी, सहकार, उद्योग, सामाजिक समतोल, महिला धोरण अशा अनेक क्षेत्रांत आदरणीय शरद पवार साहेबांचं मोलाचं योगदान आहे!— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) May 14, 2022