Navneet Rana| भाजपकडून अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र नवनीत राणा यांच्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. एकीकडे तिकीट मिळाल्यानंतर त्या अमरावतीमध्ये प्रचार करत आहेत. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालय आज त्यांच्या जात प्रमाणपत्राविषयी निर्णय देणार आहे. त्यामुळे आजच्या न्यायालयाच्या या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याआधी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करत दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यास त्यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते. न्यायालयाने जात प्रमाणपत्रच रद्द केल्यामुळे त्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करू शकणार नाहीत. तसे झाल्यास राणा यांच्याऐवजी महायुतीकडून दुसरा उमेदवार दिला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, आज सर्वोच्च न्यायलयाचे न्यायाधीश सकाळी साडे अकरा वाजता हा निकाल वाचवून दाखवणार आहेत.
नेमकं प्रकरण काय? Navneet Rana|
नवनीत राणा यांचेमुंबई उच्च न्यायालयाने 2021 ला राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवत दोन लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला होता. या निर्णयानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होतं. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच, बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद 28 फेब्रुवारीला पूर्ण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. आज याप्रकरणी अंतिम निकाल येणार आहे.
दरम्यान, माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनिल भालेराव या नेत्यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका 2017 साली दाखल केली होती. राणा यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना अनुसूचित जमातीबाबत दिलेले प्रमाणपत्र बोगस असल्याचा आणि जात प्रमाणपत्र समितीसमोरही खोटा जातीचा दाखला दिल्याचा आरोप या याचिकांमध्ये करण्यात आला आहे. यावर आता काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
हेही वाचा: