Wayanad Seat । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय समीकरणे डोळ्यासमोर ठेऊन आपल्या उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. सर्वसामान्यपणे कोणत्याही निवडणुकीतील विजयात जात आणि लोकसंख्येवर आधारित राजकीय समीकरणे महत्त्वाची भूमिका बजावतात. दरम्यान, केरळचा वायनाड लोकसभा मतदारसंघ नेहमीच चर्चेत असतो. त्याचे कारणही खासच आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी काल वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुल गांधी वायनाड मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा संसदेत जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. उत्तर केरळच्या वायनाड सीटच्या लोकसंख्येबाबत अनेक दावे केले जातात. पण खरंच ते प्रत्यक्षात किती मजबूत आहेत? याची काही राजकीय गणितं आहेत ती अगोदर समजून घेऊया…
वायनाड मुस्लिमबहुल जागा आहे का? Wayanad Seat ।
भारत राज्य निवडणुकीच्या आकडेवारीनुसार, वायनाड लोकसभा मतदारसंघात 40 टक्के मुस्लिम मतदार आहेत. त्याच वेळी, या जागेवर 40 टक्के हिंदू मतदार आहेत. 20 टक्के मतदार ख्रिश्चन समुदायाचे आहेत. या जागेवर एससी आणि एसटी मतदारांची संख्या अनुक्रमे ७ टक्के आणि ९.३ टक्के आहे. वायनाड मतदारसंघात ग्रामीण मतदार ९३ टक्के आणि शहरी मतदार ७ टक्के आहेत.
2019 मध्ये राहुल गांधींनी मोठा विजय नोंदवला
उत्तर केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ ऐतिहासिक इमारती आणि विलोभनीय निसर्गासाठी प्रसिद्ध आहे. 2008 मध्ये परिसीमन झाल्यापासून वायनाड ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून उदयास आली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी ही जागा मोठ्या मताधिक्याने जिंकली होती.
सीपीआयच्या उमेदवाराचा पराभव झाला
2019 मध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी 706367 मतांनी विजयी झाले होते. तर सीपीआयचे उमेदवार पीपी सुनीर यांना २७४५९७ मते मिळाली. राहुल गांधींनी पीपी सुनीर यांचा 431770 मतांनी पराभव केला होता.
यावेळी काय समीकरण आहे? Wayanad Seat ।
यावेळी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा मार्ग राहुल गांधींसाठी सोपा असणार नाही. सीपीआयने या जागेसाठी पक्षाचे सरचिटणीस डी राजा यांच्या पत्नी ॲनी राजा यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी भाजपने केरळ प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे याठिकाणी तिरंगी लढत होणार आहे. एवढंच नाही तर यंदाच्या निवडणुकीत मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे बोलले हात आहे.