वाघळवाडी (वार्ताहर) – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विषयी ट्विटरवरून बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर वडगाव निंबाळकर पोली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ज्ञानेश्वर पोमाणे यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यावरून पोलिसांनी ट्विटर अकाउंटधारक आय. एम. सुशील या इसमावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने माजी खासदार शरद पवार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याबाबत हेतूपुरस्सर समजात द्वेषाची भावना, शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता असणारी विधाने केली.
तसेच शांततेचा भंग घडवून आणण्याच्या उद्देशाने दोघांबाबाबत सोशल मीडियावर मजकूर प्रसारित केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक साळुंके हे करीत आहेत.