मंचर, कळंब येथे रमजान ईदनिमित्त घरातच नमाज पठाण

मंचर – येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुम्मा मशिदीमध्ये मौलाना मोईनखान रिझवी पठाण यांनी रमजान सणानिमित्त सोशल डिस्टन्सिंग या नियमांचे पालन करीत मंचर पोलिसांच्या परवानगीने सोमवारी (दि.25) सामुहिक नमाज पठण केले, तसेच कळंब येथील मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज पठण केले.

पारंपरिक आलिंगनाला फाटा देऊन नियमांचे पालन करीत एकमेकांना फक्त रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. आंबेगाव तालुक्यातील जवळपास सर्वच गावांतील मुस्लीम बांधवांनी ईद-उल-फितर (रमजान ईद) निमित्तरमजान ईदच्या नमाजसाठी प्रार्थनास्थळे न उघडता किंवा सार्वजनिक ठिकाणी एकत्रित नमाजसाठी न येता मुस्लीम समाजातील नागरिकांनी घरच्या घरीच नमाज पठण करून साध्या पद्धतीने ईद घरातच साजरी केली. मंचर मशिदीचे मौलाना मोईनखान रिझवी पठाण व मौलाना अतार-उल-हक यांनी केलेल्या आवाहनाला मुस्लीम बांधवांनी साथ दिली.

यावेळी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या, तसेच कळंब येथे मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज पठण केल्याची माहिती मुस्लीम बांधव ईसाक शेख यांनी दिली. रमजान ईदच्या दिवशी मुस्लीम बांधवांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या.

शिक्रापूरमध्ये मुस्लीम बांधवांची घरातच प्रार्थना

शिक्रापूर -मुस्लीम बांधवांचा सर्वात महत्वाचा व मोठा आणि पवित्र मानला जाणारा सण रमजान ईद, आज रमजान ईद सण अतिशय साध्या पद्धतीने साजरा होत असताना मुस्लीम बांधवांनी घरामध्येच नमाज पठण करत अल्लाहकडे करोनाला भारतातून काढून टाकण्याची प्रार्थना केली. देशभरात आज रमजान ईद हा मुस्लीम बांधवांचा महत्वाचा आणि पवित्र सण साजरा होत असताना करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लॉकडाऊनमुळे सर्व मस्जिद व प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली होती. मुस्लीम बांधवांनी महिनाभराचे उपवास करत नमाज पठण देखील घरीच केले. रमजान ईदपर्यंत लॉकडाऊन हटेल आणि रमजान ईदच्या नमाजसाठी तरी परवानगी मिळेल या आशेमध्ये सर्व मुस्लीम बांधव असताना कोणतीही परवानगी मिळू शकली नाही, त्यामुळे मुस्लीम बांधवांनी प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करत घरामध्येच नमाज पठण करून साध्या पद्धतीने सण साजरा केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.