FIR Against Aaditya Thackeray : मुंबई पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाचे तीन नेते आदित्य ठाकरे, सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील एनएम जोशी पोलिस स्टेशनमध्ये तीन नेत्यांविरुद्ध आयपीसीच्या कलम 143, 149, 326 आणि 447 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, हा गुन्हा डिलाई रोड ब्रिज लेनच्या उद्घाटनासंदर्भात नोंदवण्यात आला आहे.
मुंबई महापालिका अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. डिलाई रोडवरील सर्व कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. येत्या सात दिवासांमध्ये ही कामे पूर्ण केली जाणार होती. त्यानंतर या लेनचे काम सुरु करण्याचे महापालिकेचे नियोजन होते. मात्र, नियोजित वेळापत्रक आमि उद्घाटनापूर्वी आदित्य ठाकरे यांनी या पूलाचे उद्घाटन केले आहे. परिणामी काम अपूर्ण असतानाच या रस्त्यावरुन वाहतूक सुरु झाली आहे.
A case has been registered at NM Joshi Police Station against Uddhav Thackeray faction leader Aditya Thackeray, Sunil Shinde, and Sachin Ahir. The case has been registered under sections 143, 149, 326 and 447 of IPC: Mumbai police
More details awaited.
— ANI (@ANI) November 18, 2023
काय आहे संपूर्ण प्रकरण?
डिलाई रोड पुलाच्या एका लेनच्या उद्घाटन प्रकरणी शिवसेना ठाकरे गटनेते आदित्य ठाकरे आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाने एन.एम.जोशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काम अपूर्ण, बेकायदेशीर आणि सरकारी कामात अडथळा आणणारे असतानाही डिलाई रोडच्या दुसऱ्या लेनचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी करण्यात आले. याविरोधात मुंबई महापालिका आता अॅक्शन मोडमध्ये आहे.
मुंबई महापालिकेने या पुलाचे काम पूर्ण करून साधारणत: सात दिवसांनी विलंबित रस्त्याचे काम पूर्ण केल्यानंतर लेन खुली करण्याचे नियोजन केले होते. याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अशा पद्धतीने उद्घाटन करणे बेकायदेशीर आहे. महापालिकेच्या प्रस्तावित उद्घाटनापूर्वीच आदित्य ठाकरे यांनी या पुलाचे उद्घाटन करून त्यावरून वाहतूक सुरू केली.