छत्तीसगड छत्तीसगडमधील बेलतारा येथे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पीएम मोदींच्या सभेला जाण्यासाठी अंबिकापूर जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांची बस एका ट्रेलरला धडकली, ज्यात दोन जण ठार तर 6 जण जखमी झाले.
या बसमध्ये भाजपचे 40 कार्यकर्ते होते. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तीन जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पंतप्रधानांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी सर्व लोक अंबिकापूरहून रायपूरला जात होते. हा अपघात एवढा भीषण होता की, बसचा बहुतांश भाग चेंदामेंदा झाला. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना तातडीने बसमधून बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. मुसळधार पावसात चालकाला झोप लागल्याने अपघात होण्याची शक्यता मानली जात आहे.
आज पंतप्रधान मोदी रायपूरमध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. रॅलीपूर्वी पंतप्रधानांनी ट्विट केले की, ‘रायपूरमध्ये छत्तीसगड भाजपच्या रॅलीत जनता-जनार्दन यांच्याशी झालेल्या संवादाबद्दल मी खूप उत्सुक आहे. छत्तीसगडच्या जनतेचे भाजपशी नेहमीच घट्ट नाते राहिले आहे. त्यांचे आशीर्वाद सदैव कायम राहतील याची मला खात्री आहे. ”