जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश; मोस्ट वाँटेड दहशतवाद्याचा खात्मा 

file photo

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या हाती मोठे यश आले आहे. मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा दलाने खात्मा केला आहे. झाकीर मुसा हा सुरुवातीला हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सक्रीय होता. यानंतर अल-कायदाशी संबंधित अन्सार गजवत उल हिंद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.

पुलवामा येथील त्राल येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यानुसार गुरुवारी रात्री परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी झाकीर मुसाचा खात्मा केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, जम्मू- काश्मीरमध्ये गेल्या १८ दिवसांमध्ये सुरक्षा दलांनी १८ दहशतवाद्यांचा खात्मा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)