Prabha Atre : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे (Prabha Atre) यांचे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. प्रभा अत्रे यांना आज पहाटे झोपेतच ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचे निधन झाले होते. प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावर सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
उस्ताद राशिद खान यांच्या निधनाच्या वृत्तानंतर संगीत विश्व सावरत असतानाच हाआणखी एक धक्का बसला. संगीत विश्वातील दोन तारे निखळले आहे. दु:खद म्हणजे आज मुंबईत त्यांचा कार्यक्रम ठरला होता. यासाठी त्या पुण्याहून मुंबईला येणार होत्या, मात्र त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रभा अत्रे अनेक पुरस्कारांनी सन्मानित
भारतीय शास्त्रीय संगीत जागतिक स्तरावर लोकप्रिय करण्यात प्रभा अत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. प्रभा अत्रे यांचे संगीताच्या विविध शैलींवर प्रभुत्व होते. प्रभा अत्रे या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांचा ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मान केला आहे. तसेच भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.
शास्त्रीय संगीत या विषयावर गाढा अभ्यास
पुण्यात जन्मलेल्या प्रभा अत्रे यांनी वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक होत्या. गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, भजन, नाट्य संगीता वरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांनी 11 पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. नवी दिल्लीत त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत संगीतावरील 11 पुस्तकांचे प्रकाशन केले.