मुंबई – मुंबईत शंभर वर्षांपूर्वीचे एक भुयार आढळून आले आहे. जे जे रुग्णालयाच्या एका बिल्डिंगच्या तळाशी हे भुयार आढळून आले आहे. ब्रिटिशांच्या काळातील हे भुयार तब्बल १३० वर्ष जुने आहे. तसेच भुयार सापडलेला बिल्डिंगचा भाग नर्सिंग कॉलेजचा आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे.
Maharashtra | A 132-year-old tunnel has been discovered at the govt-run JJ Hospital in Mumbai’s Byculla. Built in the British Era, the 200-metre-long tunnel was found under the building of a medical ward (04.11) pic.twitter.com/RuNv2rbggP
— ANI (@ANI) November 5, 2022
जे जे रुग्नालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी काही कामनिमत्त पाहणी करत असताना अधिकाऱ्यांना संशयास्पद गोष्टी आढळून आल्या. लक्ष देऊन पाहणी केली असता अधिकाऱ्यांना एका ठिकाणी मोठी पोकळी दिसून आली. सुरक्षा रक्षकाच्या मदतीने सर्वांनी चाचपणी केली असता एक भुयाराचा समोर आले.
भुयार आढळताच स्थानिक प्रशासनाला तात्काळ कळवण्यात आलं. त्यासोबतच पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना देखील पाचारण करण्यात आले.भुयार असलेल्या इमारतीची बांधकाम हे १३० वर्ष जुने असल्यानं हे भुयारही १३० वर्ष जुने असल्याचं सांगण्यात येत आहे.हे भुयार २०० मीटर लांब अगदी एखाद्या बोगद्याप्रमाणे आहे. जे जे रुग्णालय तब्बल १७७ वर्ष जुने असून याच्या अवतीभोवती अनेक ब्रिटिशकालीन बांधकामा आहे.