मुंबई – भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएस अधिकारी संपत कुमार यांच्याविरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.हे प्रकरण 2013 च्या आयपीएलमधील मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजीशी संबंधित आहे. धोनीने आयपीएस अधिकारी कुमार यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल कारवाई करण्याची मागणी याचिकेतून केली आहे.
न्यायालयाने ही सुनावणी मान्य केली असून त्याची सुनावणी मंगळवारपासून होणार आहे.फिक्सिंग आणि सट्टेबाजीशी संबंधित हे प्रकरण २०१३ च्या आयपील मॅचेसशी संबंधित आहे. यावेळी आयपीएस अधिकारी कुमार हे प्रकरण पाहत होते आणि त्यांनी यादरम्यान एम एस धोनीवर देखील भाष्य केले. यावेळी धोंनीने अधीकारी कुमार आरोप करून माझी प्रतिमा मलिन करत असल्याचे म्हंटले होते तसेच न्यायालयाकडे १०० कोटींच्या अब्रू नुकसानीचा दावाही केला होता.
2014 मध्ये न्यायालयाने संपत कुमारला धोनीविरोधात कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करण्यास मनाई केली होती. मात्र असे असतानाही कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. ज्यामध्ये न्यायालयीन व्यवस्थेबद्दल आणि त्यांच्याविरुद्धच्या खटल्यांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करणारे आघाडीचे वकील यांच्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली होती. मंगळवारपासून या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी होणार आहे.
महेंद्रसिंग धोनीने 2020 मध्ये भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली भारताला दोनदा विश्वचषक जिंकून दिला आहे. धोनी आयपीएल 2023 मध्ये सीएसकेकडून खेळताना दिसणार आहे.