मुंबई – भारताचे महान वेगवान गोलंदाज विश्वकरंडक विजेते कर्णधार “कपिल देव” यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे काल त्यांना दिल्लीतील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून रात्री अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली. सध्या कपिल देव यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कपिल देव यांचे जवळचे मित्र अशोक मल्होत्रा यांनी दिली आहे.
Kapil Dev in good spirits after his angioplasty. Praying for his full recovery. He is a legend. #KapilDev pic.twitter.com/YJ94dPjwdv
— Abhinav Jaipur (@asabhisays) October 23, 2020
भारताला पहिलं विश्वचषक मिळवून देणाऱ्या माजी कर्णधार कपिल देव यांच्या दिर्घायुष्यासाठी आता समस्त क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेटपटू प्रार्थना करत आहे. त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्याकरता बॉलिवूडकर देखील मागे राहिले नाहीत. अभिनेता रणवीर सिंग आणि शाहरुख खान यांनी सुद्धा ट्विटरच्या माध्यमातून कपिल देव यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आहे.
Praying for his speedy recovery 💔Hope he gets well soon , more power & strength to the legend #KapilDev ✊ pic.twitter.com/xM9TN9Fhzz
— .. (@KingOfHearts_RS) October 23, 2020
61 वर्षीय कपिल देव यांनी 1983 साली भारतीय क्रिकेट संघाला आपल्या नेतृत्वात विश्वकरंडक स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. आज वयाच्या 61 व्या वर्षीही ते भारतीय क्रिकेटची सेवा करण्यासाठी कार्यरत आहेत. 16 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर निवृत्ती घेतल्यावरही ते एक मार्गदर्शक तसेच समालोचक म्हणून कार्यरत आहेत.
Get well sooner than soon Paaji! @therealkapildev wishing you a speedy recovery as fast as your bowling & batting. Love to you sir
— Shah Rukh Khan (@iamsrk) October 23, 2020