नवी दिल्ली – देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या पोलिसांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलीस स्मृती दिनानिमित्त आदरांजली अर्पण केली आहे. “देशभरातले पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.
देशासाठी बलिदान देणाऱ्या पोलिसांना आपण आदरांजली अर्पण करतो. त्यांचे बलिदान आणि सेवा सदैव स्मरणात राहील. कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यापासून ते मोठे- मोठे गुन्हे शोधण्यापर्यंत,आपत्ती व्यवस्थापन ते कोविड-19 विरोधातल्या लढ्यापर्यंत आपले पोलीस सदैव तत्पर असतात.
Police Commemoration Day is about expressing gratitude to our police personnel and their families all across India. We pay tributes to all the police personnel martyred in the line of duty. Their sacrifice and service would always be remembered. pic.twitter.com/69gkT1yH24
— Narendra Modi (@narendramodi) October 21, 2020
त्यांची मेहनत आणि नागरिकांना सहाय्य करण्याची तत्परता याचा अभिमान आहे,’ असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आज नायगाव पोलीस मुख्यालयात शहिद पोलिसांना श्रद्धांजली अर्पण केली.
आपल्या संदेशात मुख्यमंत्र्यांनी विविध पोलिस दलांमधील 26 पोलीस अधिकारी आणि 240 पोलीस अंमलदारांना आपले कर्तव्य बजावतांना वीरगती प्राप्त झाल्याबद्धल श्रद्धांजली वाहिली व या वीरश्रेष्ठांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन केले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री (शहर) सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई उपस्थित होते.