मुंबई – बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी उडाली आहे. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
या यादीमध्ये महाराष्ट्रातून स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे तसेच अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या या यादीतील सर्व नेते निवडणुकांच्या प्रचारसभेत सहभागी होणार आहे. राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत एकूण 39 नेत्यांची नावे आहेत.
बिहार विधानसभेचा पहिला टप्पा 28 ऑक्टोबरला पार पडणार आहे. येत्या काही दिवसांतच प्रचारसभांची रणधुमाळी सुरू होणार आहे.