चंदीगड – केंद्र सरकारच्या नव्या शेतीविषयक विधेयकांच्या विरोधात पंजाबातील शेतकऱ्यांनी कालपासून तीन दिवसीय खेती बचाव यात्रा व ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीचे उद्घाटन काल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. पंजाबप्रमाणेच हरियाणा येथे देखील केंद्र सरकारच्या नव्या कृषी विषयक विधेयकांना जोरदार विरोध होत असून राहुल गांधी हे तेथील शेतकरी रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी ६ व ७ ऑक्टोबरला हरियाणा दौऱ्यावर जाणार आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या या नियोजित दौऱ्यावर हरियाणाचे मुख्यमंत्री एम एल खट्टर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खट्टर यांनी याबाबत एका नामांकित वृत्तसंस्थेशी बोलताना, “मला राहुल गांधींच्या दौऱ्यापासून कोणतीही अडचण नाही. मात्र कायदा व सुव्यवस्थेला तडा जात कामा नये. जर ते पंजाबमधील लोकांचा जत्था घेऊन येणार असतील तर त्याला परवानगी दिली जाणार नाही. ते येथील लोकांसोबत रॅली काढू शकतात.”
I have no problem but law & order shouldn’t be disrupted. If he will come with a procession from Punjab, that will not be allowed. He can do rally with the people here: Haryana CM ML Khattar on reports that Congress leader Rahul Gandhi will be visiting Haryana to meet farmers pic.twitter.com/BoVMstEmr6
— ANI (@ANI) October 5, 2020
राहुल गांधींचा मोदी सरकारच्या कृषी कायद्यांवर हल्लाबोल
पंजाब येथे शेतकरी रॅलीला संबोधित करताना राहुल गांधी यांनी, “शेतकऱ्यांना जी किमान आधारभूत किंमत देण्याची सध्याची पद्धत आहे ती पद्धत आणि सरकारकडून केली जाणारी धान्य खरेदीची पद्धत मोदी सरकारला बंद पाडायची आहे. पण आम्हीं तसे होऊ देणार नाही. केंद्रात कॉंग्रेस सरकार सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारने केलेले सर्व काळे कायदे रद्द केले जातील.” अशी घोषणा केली.