नवी दिल्ली – यंदाची आयपीएल स्पर्धा भारताऐवजी अमिरातीत चालू आहे. करोनाचा धोका वाढल्याने भारतात ही स्पर्धा घेता येत नसल्याने त्याचे आयोजन अमिरातीत करण्यात आले. दरम्यान, आयपीएल स्पर्धेदरम्यान एका संघातील खेळाडूशी एका बुकीने संपर्क साधल्याचे बीसीसीआयनेच जाहीर केले आहे.
अर्थात याबाबत अधिक माहिती देण्यास बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक समितीने नकार दिला आहे. एका ऑनलाइन फिक्सिंगच्या अॅपद्वारे हा संपर्क साधण्यात आला असून समिती आता त्याचा तपास करत आहे.