पॅरिस :- स्पेनचा लाल मातीच्या कोर्टवरचा बादशहा राफेल नदाल याने अपेक्षेप्रमाणे फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत घोडदौड कायम राखली आहे. त्याने तिसऱ्या फेरीत स्टेफनो स्टेवगलियावर 6-1, 6-4, 6-0 असा सहज पराभव करत चौथी फेरी गाठली.
या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अन्य सामन्यात रुमानियाच्या सिमोना हालेपने अमेरिकेच्या अमांडा एनिसिमोवचा 6-0, 6-1 अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली. युक्रेनच्या एलेना स्वेतलानाने रशियाच्या एकतरीना अलेक्झांड्रा 6-4, 7-5 असा पराभव केला.
पुरूष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत ऑस्ट्रियाच्या डॉमनिक थिमने नॉर्वेच्या कॅस्पर रूडवर 6-4, 6-3, 6-1 असा सरळ तीन सेटमध्ये विजय मिळवला. आता चौथ्या फेरीत मानांकितांमधील चुरस आणखी वाढणार आहे.