शारजा – आयपीएल स्पर्धेत आज मुंबई इंडियन्स विरूध्द सनरायझर्स हैदराबाद असा सामना रंगणार आहे. दोन्ही संघाची आतापर्यंतची स्पर्धेतील कामगिरी सरस ठरली आहे. पण कर्णधार रोहित शर्मा, कॅरन पोलार्ड, हार्दिक पंड्या व इशान किशन या पॉवर हिटर्सला कसे रोखायचे हेच आव्हान सनरायझर्स हैदराबादसमोर आजच्या सामन्यात राहणार आहे.
मुंबई विरूध्द हैदराबाद या सामन्यास काही वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा मुंबई इंडियन्सच्या बाजूने लागला आहे. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, स्पर्धेत मुंबई इंडियन्स आणि हैदराबाद या दोन्ही संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. दोन्ही संघाना दोन सामन्यात विजय आणि दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.