रांजणगाव गणपती – येथील पुणे-नगर महामार्गावर रांजणगाव- गणेगाव रस्त्यावर महागणपती मंदिराच्या मागील बाजूस भुयारी मार्ग करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
पिंपरी दुमाला, खंडाळे, वाघाळे गणेगाव खालसा, वरुडे, शास्ताबाद, चिंचोली मोराची, शिंगाडवाडी, कान्हुर मेसाई, खैरेनगर, पाबळ या गावांकडे जाण्यासाठी या ठिकाणी पुणे-नगर महामार्ग ओलांडावा लागत आहे. त्यामुळे हा रस्ता ओलांडत असताना अपघात होऊन अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत.
पुणे-नगर महामार्गाच्या रुंदीकरणाच्या निविदा निघाल्या. मात्र पुढे काय झाले हे अधिकारी व नेत्यांनाच माहित या विभागाच्या आमदार , खासदार व माजी खासदार व स्थानिक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी लवकरात लवकर भुयारी मार्ग करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप सोनवणे रोहिदास खेडकर दत्तात्रय शेळके व अमोल डोळस यांनी यावेळी केली आहे.