मोदी सरकार ८० हजार कोटींचा बंदोबस्त करेल का?

Madhuvan

नवी दिल्ली – करोनावरील लस सर्व भारतीयांना देण्यासाठी पुढील वर्षभरात केंद्र सरकारला 80 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आव्हान केंद्र सरकारपुढे आहे. याची जाणीव सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी करून दिली आहे. त्यांनी आपले ट्विट पंतप्रधान कार्यालयाला टॅग केले आहे. या प्रश्नानंतर अनेक  लोकांनी मोदी सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे.

याच मुद्याला अनुसरून  एमआयएमचे अध्यक्ष खासदार ओवेसी यांनी, पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी “सर तुमचे सरकार ८०,००० कोटी रुपयांचा बंदोबस्त करेल का? सर थाळी, टाळी, लाईट बंद, २१ दिन? ९३ हजार ३७९ मृत्यू. अगोदर घरात दिवा त्यानंतर…” अशा शब्दांमध्ये ओवेसींनी ट्विट करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

तत्पूर्वी, भारत सरकारकडे पुढील वर्षभरात 80 हजार कोटी रुपये उपलब्ध होतील का? त्यामुळे देशातील प्रत्येकाला लस खरेदी आणि वितरित करता येईल. या आपल्यापुढील चिंता करायला लावणाऱ्या आव्हानाला तोंड द्यायचे आहे, असे  ट्विट करत करोनावरील लस सर्व भारतीयांना देण्यासाठी पुढील वर्षभरात केंद्र सरकारला 80 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आव्हान केंद्र सरकारपुढे आहे. याची जाणीव सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला यांनी  मोदी सरकारला  करून दिली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.