बॉलीवूडमधील अन्य कलाकारांप्रमाणेच अभिनेत्री सोनम कपूर-आहूजाही सोशल मीडियावर ट्रोलिंगची शिकार होत आहे. याबद्दल सोनमने एका मुलाखतीत सांगितले की, गेल्या तीन-चार महिन्यांमधील काळ तणावपूर्ण होता. आजूबाजूच्या नकारात्मकतेने मानसिक दबाव वाढला आहे.
सोनम म्हणाली, सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी घडत असतात. तसेच द्वेष आणि नकारात्मक चर्चेमुळे मला कमकुवत आणि नकारात्मकही बनवित होते. मात्र आतापर्यंत स्वत:ची तब्येत बरी असल्याचे तिने सांगितले. सुशांतसिंह राजपूत यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूड स्टार किड्सला खूप ट्रोल करण्यात येत आहे.
यानंतर ट्रोलिंगमुळे त्रस्त झालेल्या सोनमने इंस्टाग्रामवरील कमेंट सेक्शन तात्पुरते बंद केले होते. संसदेत बॉलिवूडचा बचाव करण्यासाठी जया बच्चन यांनी केलेल्या वक्तव्याचे सोनमने स्वागत केले होते.
View this post on Instagram
The best dress to chill in from @bhaane 📸 @anandahuja #bhaane ships worldwide
दुसरीकडे फिल्म इंडस्ट्रीबद्दल कंगना राणावत आणि रवी किशन हे सातत्याने वादग्रस्त टिपण्णी करत आहे. वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास सोनम अखेरच्या वेळी “जोया फॅक्टर’मध्ये झळकली होती. सोनमने अद्याप आपल्या आगामी चित्रपटाबाबत घोषणा केलेली नाही.