मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी फिटनेसवर देशातील अनेक खेळाडू, सेलिब्रेटी यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत मिलिंदची आणि त्यांच्या फिटनेसबाबत नरेंद्र मोदींनी ‘फिट इंडिया संवाद’ अंतर्गत गप्पा मारल्या.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी यावेळी मिलिंद सोमणला तुझं खरं वय काय ? असा प्रश्न विचारला. यावर मिलिंद सोमणनेही आपल्याला नेमकी कुठून प्रेरणा मिळते याचं उत्तर दिलं.
यातच मिलिंदने तुझं खरं वय काय ? असा प्रश्न विचारला असता यावर मिलिंद सोमणनेही हसून उत्तर दिलं की, “अनेकजण मला तुझं वय खरंच ५५ आहे का असं विचारतात. या वयातही मी ५०० किमी कसं काय धावू शकतो याचं त्यांना आश्चर्य वाटतं.
तो पुढे म्हणाला, ‘माझ्या आईचं वय ८१ वर्ष आहे आणि मी जेव्हा ८१ वर्षांचा होईन तेव्हा तिच्यासारखंच व्हायचं आहे. माझी आई माझ्यासाठी आणि इतर अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे.’
दरम्यान, नरेंद्र मोदींनी यावेळी कौतुकाने मिलिंद सोमणचा उल्लेख ‘मेड इन इंडिया मिलिंद’ असा केला. मोदींनी मिलिंद सोमणला आपण त्याच्या आईचा पुश-अप करतानाचा व्हिडीओ पाच वेळा पाहिला होता अशी आठवणही सांगितली. तो व्हिडीओ पाहून आपण आश्चर्यचकित झाल्याचं ते म्हणाले.
मिलिंदच्या वयाच्या मानाने त्याचा असलेला फिटनेस सर्वांनाच अचंबित करणारा राहिला आहे. जगात सर्वांत आव्हानामक समजली जाणारी ट्रायथलॉन आयर्नमॅन स्पर्धा नुकतीच झुरीच ( स्वित्झरलंड) येथे २०१७ साली पार पडली. या स्पर्धेच्या विजेतेपदावर अभिनेता, मॉडेल आणि धावपटू मिलिंद सोमण याने नाव कोरले आहे