‘माझे कुटुंब…’ उधारीवरच

आधीच खडखडाट त्यात ग्रा.पं.वर सर्वेक्षणाचा भार


आवश्‍यक वस्तू उधारीवर मागून आणण्याची वेळ 

पुणे – करोना संसर्ग कमी व्हावा, बाधित व्यक्‍तींचे तत्काळ निदान होऊन करोनाची साखळी तुटावी यासाठी जिल्ह्यात “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या अभियानांतर्गत गावांमध्ये सर्वेक्षण सुरू आहे. मात्र, त्यासाठी आवश्‍यक वस्तू, व्यवस्थेसाठी ग्रामपंचायतींवर खर्चाचा भार पडत आहे. आधीच खडखडाट असलेल्या ग्रामपंचायतींना अनेक गोष्टी उधारीवर कराव्या लागत असून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन योजनेतून निधी कधी मिळणार याची प्रतीक्षा त्यांना लागली आहे. 

जिल्ह्यातील 1 हजार 413 ग्रामपंचायतींच्या क्षेत्रांमध्ये करोना संसर्ग नियंत्रणासाठी आरोग्य तपासणी आणि सर्वेक्षणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 10 लाख नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. या सर्वेक्षणासाठी नेमलेल्या पथकांच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतींकडून सध्या केली जात आहे.

मोहिमेच्या शासनाला देशांमध्ये हा खर्च ग्रामीण आरोग्य मिशनच्या निधीमधून करावा, असे स्पष्टपणे म्हटले आहे; परंतु अद्यापही कोणत्याही ग्रामपंचायतीला या मिशनमधून निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नाही.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम ग्रामीण भागांमध्ये यशस्वी होताना दिसत आहे. सर्वेक्षणांमध्ये संशयित रुग्णांची तत्काळ करोना चाचणी करून विलगीकरण आणि उपचार वेळेत सुरू होतात. त्यामुळे बाधितांना दिलासा मिळतो. तसेच संसर्ग रोखण्यासाठीदेखील ही मोहीम उपयुक्त ठरत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.