डिस्नी प्लस व हॉटस्टारने गाण्याची चाल चोरली
मुंबई – आयपीएलसाठी थिमसॉंग तयार केले होते. मात्र, त्याची चाल डिस्नी प्लस व हॉटस्टार या कंपन्यांनी ही चाल चोरल्याचा आरोप प्रसिद्ध रॅप सॉंग निर्माता कृष्णा याने केला आहे.
आयपीएलला जास्त लोकप्रियता मिळावी यासाठी मी हे रॅपसॉंग बनवले होते. देख कौन आया वापस, हे रॅपसॉंग मी तीन वर्षांपूर्वीच तयार केले होते. या गाण्याची चाल डिस्नी प्लस व हॉटस्टारने याची चाल चोरून नवे गीत तयार केले आहे. हे तयार करताना माझी परवानगी तर घेतली गेलीच नाही उलट मला त्याचे श्रेयही दिले नाही. कोणाला विश्वास बसत नसेल तर आयपीएल अँथम पाहू शकता, असा दावाही कृष्णाने केला आहे.
हे गीत तयार करताना मी जी चाल वापरली तीच चोरली गेली आहे. या दोन्ही कंपन्यांनी यंदाच्या आयपीएलसाठी जे गाणे तयार केले आहे, ती माझी चाल आहे, असेही कृष्णाने सांगितले आहे.
आयपीएल समितीने रविवारी हे गाणे सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे. आतापर्यंत जवळपास 20 लाख लोकांनी हे गाणे लाइक केले आहे.
रॅपर कृष्णाने 2017 साली एक व्हिडीओ बनवला होता. देखो कौन आया वापस, अशा आशयाचे हे गाणे आहे. मात्र, त्याची चाल चोरली गेल्याचे लक्षात आल्यावर त्याने हा आरोप केला आहे.