रिया आणि शोविकचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मादकद्रव्यांचा पुरवठा केल्याच्या अनुषंगाने अटक करण्यात आलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक या दोघांचे जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावले.

मादक द्रव्य प्रकरणातील कायद्या अंतर्गत नेमण्यात आलेल्या विषेश न्यायालयात या दोन्ही भावंडांचे जामीन अर्ज दाखल करण्यात आले होते. या प्रकरणातील अन्य चार आरोपींचेही जामीन फेटाळून लावण्यात आले आहेत.

रिया आणि तिच्या भावानेच सुशांतसिंह साठी ड्रग्ज आणण्याची व्यवस्था केली होती असा सरकारी पक्षाचा दावा आहे. त्यामुळे सरकारी वकिल अतुल सरदेशपांडे यांनी त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला.

या प्रकरणात रियाला तीन दिवसांपुर्वी अटक करण्यात आली होती तर तिचा भाऊ शोविक आणि राजपूत याच्या घराचा व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडा याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सीबीआय, ईडी, बिहार पोलिस, महाराष्ट्र पोलिस आणि मादकद्रव्य विरोधी विभाग अशा विविध संस्थांमार्फत रियाची चौकशी गेले अनेक दिवस केली गेली होती. त्यानंतर मात्र तिला मादकद्रव्य प्रकरणात अटक झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.