मॉस्को : वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना अनेकवेळा अशा काही आव्हानाना सामोरे जावे लागते कि त्याची त्यांना कल्पनाही नसते रशियातील दागिस्तान येथील डॉक्टरांना नुकताच अशाच एका आव्हानाला सामोरे जावे लागले
दागिस्तान येथील एक महिला आपल्या घराच्या अंगणात झोपली असताना तिचे तोंड उघडे राहिले होते तिला काही कल्पना नसतानाही तिच्या तोंडात तब्बल एक मीटर लांबीचा साप शिरला. सापाच्या हालचालीने तिला जाग आली तेव्हा साप बऱ्यापैकी आत शिरला होता या घटनेमुळे ती घाबरली तिच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना बोलावले पण त्यांनाही सापाला बाहेर कसे काढावे हे क्षणभर समजेना अखेर त्यांनी आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावून सापाला बाहेर काढले.
या सर्व उपचाराचा व्हिडीओ डॉक्टरांनी तयार केला होता तो व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला तेव्हा त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. अर्थात डॉक्टरांच्या कौशल्याचे सर्वानीच कौतुक केले ती महिला आणि तो साप या दोघांनाही कोणतीही इजा झाली नाही हे विशेष.