- त्वरित रस्ता बनविला नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशारा
कर्जत : “एमएमआरडीए’च्या माध्यमातून कर्जत-पळसदरीमार्गे खोपोली चौपदरी करणाचे मागील चार वर्षांपासून सुरू आहे. सिमेंट क्रॉंक्रिटच्या या रस्त्यासाठी करोडोचा निधी खर्च केला जात आहे. या रस्त्याच्या कामाच्या सुरवातीपासूनच या कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत आले आहेत. त्यावेळेस माजी आमदारांनी या रस्त्याच्या कामाबाबत साशंकता व्यक्त करीत विधिमंडळात तारांकीत प्रश्न उपस्थित केला.
या ठेकेदाराचे बिल रोखण्यात यावे अशीही मागणी केली होती . परंतु तसे काय होताना दिसून आले नाही; मात्र हा रस्ता प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. त्वरित रस्ता करण्यात आला नाही, तर यावर आंदोलन करण्यात आली, असा इशारा पूजा सुर्वे यांनी दिला आहे.
राज्यमार्ग दर्जाच्या रस्त्यात काही भागात डांबरी, तर काही भागात सिमेंटकॉंक्रीटचे काम करण्यात आले. मात्र डांबरी रस्त्यात पावसामुळे प्रचंड खड्डे पडले असून, या रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांसाठी हा रस्ता धोकादायक बनला आहे. कर्जत शहरापासून खोपोलीकडे जाणाऱ्या वाहनचालकांसाठी पळसदरी येथून जाणारा रस्ता जवळचा आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जड वाहने ये-जा करीत असतात. हा रस्ता शहापूर-मुरबाड-कर्जत-खोपोली या राज्यमार्ग रस्त्याचा भाग असून, या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे.
कर्जतपासून सुरुवात केली असता तिघा गावाजवळ सिमेंट कॉंक्रीटचा रस्ता संपतो आणि तेथे डांबरी रस्त्यावर भलेमोठे खड्डे आणि सोबत तो रस्ता सुरू होताना अर्ध्याहून अधिक फुटाचा रस्ता खाली आहे. परिणामी वाहने आदळतात. आणि वाहनाचे नुकसान होते. त्यात खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने अपघातही घडत आहे. याची दाखल घेऊन या रस्ता बनविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
गेले अनेक वर्षांपासून पळसदरी रस्त्याचे काम होत आहे. यावर कोण लोकप्रतिनिधी भाष्य करायला तयार नाही. नक्की याचे अर्थ काय समजू. या गावाचा संपर्क कर्जतला जोडला असल्याने कामानिमित्त ये-जा करावी लागते. मात्र खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न येत असल्याने कधी-कधी अंधारात घडी खचली जाते. दुखापत होते. याला जबाबदार कोण, त्वरित रस्ता केला नाही, तर यावर आंदोलन केले जाईल.
– पूजा सुर्वे, ग्रामस्थ