नवी दिल्ली – देशाचे माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिग्गज नेते प्रणव मुखर्जी यांचं आज वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं आहे. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुत्र अभिजीत यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.
With a Heavy Heart , this is to inform you that my father Shri #PranabMukherjee has just passed away inspite of the best efforts of Doctors of RR Hospital & prayers ,duas & prarthanas from people throughout India !
I thank all of You 🙏— Abhijit Mukherjee (@ABHIJIT_LS) August 31, 2020
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
पूर्व राष्ट्रपति, श्री प्रणब मुखर्जी के स्वर्गवास के बारे में सुनकर हृदय को आघात पहुंचा। उनका देहावसान एक युग की समाप्ति है। श्री प्रणब मुखर्जी के परिवार, मित्र-जनों और सभी देशवासियों के प्रति मैं गहन शोक-संवेदना व्यक्त करता हूँ।
— President of India (@rashtrapatibhvn) August 31, 2020
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. “माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल ऐकून मन दुखावलं. त्यांचा मृत्यू एका युगाचा अंत आहे. प्रणव मुखर्जी यांचे कुटुंबीय, मित्र आणि सर्व देशवासियांबद्दल मी मनापासून शोक व्यक्त करतो.