पुणे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पुणे दौऱ्यात माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर मुर्मू यांचा पहिलाच पुणे दौरा आहे. ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ आणि ‘ आर्म्ड फोर्स मेडिकल कॉलेज’च्या कार्यक्रमासाठी त्या पुण्यात आल्या आहेत. प्रतिभा पाटील यांनी पुणेकरांच्यावतीने मुर्मू यांचा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मूर्ती आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.
प्रताप परदेशी आणि डॉ. अविनाश भोंडवे यांनी लिहिलेल्या ‘बाल रक्षण कायद्याचे (पोस्को) अंतरंग’ या पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती मुर्मू यांना भेटीदाखल देण्यात आली.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, ग्रामविकास मंत्री दादा भुसे, पाटील यांच्या कन्या ज्योती राठोर, जयेश राठोर आणि विनित परदेशी उपस्थित होते.