पुणे – व्हेक्टर इन्फॉरमॅटिक इंडिया पुणे व मुंबईतील गरीब व्यक्तींच्या कोविड-19 चाचण्यांसाठी देणगी म्हणून 55 लाख रुपये खर्च करणार आहे.
व्हेक्टर इंडियाने यासाठी पुण्यात कृष्णा डायग्नॉस्टिक्स व मुंबईत बी ह्युमन फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेबरोबर काम करण्याचे ठरवले आहे. रुग्णांचे नमुने गोळा करण्यासाठी एक फिरते केंद्र सुरू करण्यात आले असल्याचे व्हेक्टर इन्फॉरमॅटिक इंडियाच्या मार्केटिंग आणि कम्युनिकेशन्सचे प्रमुख पुष्कर सोनार यांनी केले.
पुढील महिन्यात आम्ही हा उपक्रम बंगळुरू येथे सुरू करणार आहोत, असे व्हेक्टर इन्फॉरमॅटिक इंडियाच्या मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख मुग्धा वर्तक म्हणाल्या. व्हेक्टर इंडियाचे कर्मचारीही व्यक्तीशः या कार्यात सहभाग घेत आहेत.