शिक्रापूर -येथील परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी आज एकाच दिवसात तब्बल 14 करोना बाधित रुग्ण आढळून आले. अशी माहिती तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली.
दिवसभरात शिक्रापूर येथे तीन, सणसवाडीत सहा तर डिंग्रजवाडीत पाच असे एकूण 14 करोना बाधित रुग्ण आढळले. यापैकी सणसवाडी, डिंग्रजवाडी येथील सर्व रुग्ण करोना बाधितांच्या संपर्कातील असल्याचे समोर आले आहे.
परिसरातील करोना बाधित नवीन रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे व आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, आरोग्य सेविका जनाबाई शिरसाठ, शोभा ढमढेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे रुग्ण राहत असलेल्या परिसरात औषध फवारणी केली आहे.