चार दिवसांपासून बाधितांची संख्या घटली : दिवसभरात 36 पॉझिटिव्ह
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – खेड तालुक्यात करोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत मागील चार दिवसांपासून घट होत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्के झाले आहे. मागील 24 तासांत तालुक्यात नव्याने 36 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, अशी माहिती पंचायत समितीचे सभापती अंकुश राक्षे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
खेड तालुक्यात सरासरी 60 वर पोहचलेली करोनाबाधितांची संख्या सरासरी 40 वर आली आहे. आतापर्यंत 1835 बाधितांची नोंद झाली असून त्यापैकी 1460 जणांनी करोनावर मात केली आहे. तर 47 जणांचा मृत्यू झाला असून 328 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चाकण वगळता राजगुरूनगर व आळंदी नगरपरिषद हद्दीत रुग्ण संख्या कमी झाली आहे.
खेड तालुक्यात मागील 24 तासांत चाकण (6),आळंदी (8), राजगुरूनगर (2) अशा तीन नगरपरिषदां मिळून 16 तर ग्रामीण भागातील जऊळके बुद्रुक (1), निमगाव (1), कनेरसर (1), कडूस (1), चांदूस (1), खराबवाडी ( 2), मेदनकरवाडी (1), नाणेकरवाडी (1), म्हाळुंगे (1),चिंबळी (1), सोळू (3), भोसे (1), धानोरे (2), दौंडकरवाडी (1), मोई (1), होलेवाडी (1), या 16 गावांत 20 अशा एकूण 36 बाधित आढळले आहेत.