शिरूर(प्रतिनिधी) : शिरूर शहरासह शिरूर तालुक्यात चार गावात सहा कोरोना बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे. यामुळे शिरूर तालुक्यातील कोरोना बाधित यांचा आकडा 459 एवढा झाला आहे. यापैकी 217 रुग्ण बरे झाले तर 223 रुग्णांवर उपचार सुरू असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
शिरूर तालुक्यातील अनेक भागात नव्यानं कोरोना बाधित रुग्ण आढळत असून, यापुढील काळात कामगार मंत्री व जिल्हाधिकारी स्थानिक आमदार यांनी शिरूर तालुक्यात सर्व सोयीयुक्त कोविड केअर सेंटर सुरू करण्याची घोषणा केली आहे. परंतु हे होणार कधी? सर्वात मोठा प्रश्न असून, लवकरात लवकर हे सेंटर उभे करून नागरिकांना मोफत उपचार मिळवण्यासाठी सोय करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
शिरूर शहरातील कुंभार आळी येथे ४२ वर्षीय पुरुष, तर रेव्हेन्यू कॉलनी येथील एक 38 वर्षीय डॉक्टर असे दोन कोरोना बाधित आढळले आहे. शिरूर तालुक्यात आज शिरूर शहरात २, सणसवाडी २, रांजणगाव गणपती १, विठ्ठल वाडी १ असे चार गावात सहा कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे.