कुआलालंपूर (मलेशिया) – मलेशियातील कोर्टाने माजी पंतप्रधान नजीब रझाक यांना मंगळवारी 12 वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. नजीब यांना कोट्यवधी डॉलरच्या राज्य गुंतवणूक निधीतील 1 एमडीबी इतक्या रकमेची लूट केल्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवण्यात आले होते. गैरव्यवहाराच्या या प्रकरणामुळे दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणूकीत मलेशियातील नजीब यांचे सरकार कोसळले होते.
दोषी ठरविण्यात आलेले पहिले मलेशियन नेते ठरल्यामुळे नजीब शांत व दगडी चेहऱ्याने उपस्थित होते. शिक्षा सुनावण्यापूर्वी या निर्णयावर अपील करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आणि या गुन्ह्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नसल्याचेही त्यांनी शपथेवर सांगितले.
नजीब यांना सत्तेचा गैरवापर केल्याच्या एका गुन्ह्यात 12 वर्षांची शिक्षा, तीन गुन्हेगारी विश्वासाचे उल्लंघन केल्याबद्दल प्रत्येकी 10 वर्षे आणि मनी लॉन्डरिंगच्या तीन प्रकरणात प्रत्येकी 10 वर्षे शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच 210 दशलक्ष रिंगिट (49.4 दशलक्ष डॉलर) इतका दंडही ठोठावण्यात आला. परंतु, त्यांना या सर्व शिक्षा एकाचवेळी भोगण्याचे आदेश दिले गेले आहेत. म्हणजे नजीब यांना सर्व मिळून 12 वर्षांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा भोगावी लागेल.
नजीब यांनी पंतप्रधानपदाच्या विश्वासाच्या पदावरूनच हा गुन्हा केला होता. इतरांनाही हाच गुन्हा करण्यापासून रोखण्याची गरज लक्षात घेऊन ही शिक्षा योग्यच असल्याचे न्यायाधीश म्हणाले.