नवी दिल्ली -देशात एकाच दिवसात 47 हजार 703 नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे देशातील करोनाबाधितांच्या संख्येने 15 लाखांचा टप्पा ओलांडला. देशात सलग सहाव्या दिवशी 45 हजारांहून अधिक बाधितांची भर पडली. आणखी 654 बाधित दगावल्याने देशातील करोनाबळींची संख्या 34 हजारांवर गेली आहे.
देशात सर्वांधिक बाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या तामीळनाडूत 2 लाख 27 हजारांहून अधिक बाधित आहेत. दिल्लीत 1 लाख 32 हजार हून अधिक जणांना करोना संसर्ग झाला आहे. त्याशिवाय, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांनी बाधित संख्येत 1 लाखाचा टप्पा पार केला आहे.