Helicopters Collide in Malaysia| मलेशियामध्ये लष्करीच्या दोन हेलिकॉप्टर्सची हवेत टक्कर झाल्याची घटना घडली आहे. मलेशियामध्ये रॉयल मलेशियन नेव्हीचा वार्षिक कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी लष्करी तालीम सुरु होती. याच दरम्यान ही दुर्देवी घटना घडली. या भीषण अपघातात एकुण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व वैमानिक दलाचे सदस्य होते. सध्या या मृत व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
नेमक कसा घडला अपघात ? Helicopters Collide in Malaysia|
मंगळवारी सकाळी 9 वाजून 32 मिनिटांनी मलेशियाच्या पश्चिम भागात असणाऱ्या पेराक येथील लुमूट या नौदलच्या तळावर लष्करी तालीम होत्या. मलेशियन नौदलाच्या 90 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यासाठी हेलिकॉप्टर्सच्या तुकडीकडून सराव सुरु होता. त्यावेळी HOM (M503-3) हेलिकॉप्टर फेनेक हेलिकॉप्टरच्या रोटरला जाऊन धडकले.
Military helicopters collide in Malaysia
SOURCE: HOF @BoGoAZ5 pic.twitter.com/OAgceMCong
— The Gary & Dino Show (@garyanddino) April 23, 2024
ही टक्कर झाल्यानंतर हेलिकॉप्टर्सच्या पंख्याचा भाग तुटला आणि दोन्ही हेलिकॉप्टर्स जमिनीवर कोसळली. या धडकेनंतर फेनेक हेलिकॉप्टर जवळच्या स्वीमिंग पूलमध्ये जाऊन कोसळले. तर HOM हे दुसरे हेलिकॉप्टर नौदलाच्या तळाजवळ असलेल्या मैदानात क्रॅश झाले. Helicopters Collide in Malaysia|
या अपघातात हेलिकॉप्टर्समध्ये बसलेल्या 10 जणांचा जागीच मृत्यू झाला. या सगळ्यांचे मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी लुमुट येथील लष्करी रुग्णालयात पाठवण्यात आले असल्याची माहिती मलेशियन नौदलाकडून देण्यात आली आहे. परंतु हा अपघात नेमका कशामुळे याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मलेशियन नौदलाकडून या दुर्घटनेची सध्या चौकशी केली जात आहे. या दुर्घटनेनंतर मलेशियाचे संरक्षणमंत्री दातुक सेरी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत.
हेही वाचा:
पंतप्रधानांच्या मंगळसूत्राच्या वक्तव्यावर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “हे सर्व मतांसाठी..”