एकूण कोरोना रुग्णसंख्या ११९ वर पोहचली
वाघोली (प्रतिनिधी) : काही अंशी खालावलेल्या वाघोलीतील कोरोना रुग्णांच्या आकड्याने जोरदार मुसंडी घेतली असून १५ जुलै रोजी दिवसभरामध्ये १८ कोरोना रुग्णांची भर पडली आहे.
वाघोलीत एकूण ११९ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत, यापैकी ४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ७७ रुग्ण अॅक्टीव आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात केसनंदमध्ये देखील ३ कोरोना रुग्णांची वाढ झाली असून येथील ११ पैकी ९ रुग्ण अॅक्टीव आहेत.
वाघोलीमध्ये लॉकडाऊन सुरु असतानाही कोरोना रुग्णांच्या आकड्यामध्ये झपाट्याने होणारी वाढ वाघोलीकरांच्या चिंतेत भर टाकणारी आहे. वाढता आकडा कमी करण्यासाठी वाघोलीतील नागरिकांनी मास्क बांधणे, गर्दीत जाणे टाळणे व प्रशासकीय नियमांचे पालन करणे गरजेचे बनले आहे.