योजनेला लवकरच अंतिम स्वरूप मिळणार : रामभाऊ दाभाडे
वाघोली (प्रतिनिधी) : वाघोली ग्रामपंचायतीच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या अनूषंगाने सिंचन विभाग पाणी पुरवठा शाखा पुणे येथे या पाणी योजनेचे पीएमआरडीएच्या वतीने ग्रामपंचायतीने सिंचन विभागाच्या बरोबर करार करण्यासंबंधीची मीटिंग शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार व माजी सरपंच शिवदास उबाळे तसेच सिंचन विभाग अधिकारी शेटे साहेब, कुंभार भाऊसाहेब, वाघोलीच्या सरपंच वसुंधरा शिवदास उबाळे यांच्या समवेत संपन्न झाली.
वाघोली व इतर गावांसाठी पाणी पुरवठा योजना राबवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत. लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे .
-रामभाऊ दाभाडे (माजी जिल्हा परिषद सदस्य, पुणे)
यामध्ये करार नामापोटी पाणी पुरवण्यासाठी ग्रामपंचायतीने 11 कोटी 5 लाख रुपये सिंचण विभागास भरणे आहे ते जर भरले नाही तर मंजुर योजना ही रद्द होऊ शकते या विषयावर चर्चा करण्यात आली.