नवी दिल्ली – राजस्थान काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी विकोपास गेली असून सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. यापूर्वी सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकवत आपल्याकडे 30 आमदारांचा पाठिंबा असून मुख्यमंत्री अशोक गहलोत हे अल्पमतातील सरकार चालवत आहेत असा दावा केला होता.
काल दिवसभर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पायलट यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश आले नाही. अखेर काँग्रेसतर्फे पायलट यांच्यावर कारवाईचे अस्त्र उगारण्यात आले असून त्यांना संविधानिक व पक्ष संघटनेतील पदावरून दूर करण्यात आले आहे.
दरम्यान, पक्षाच्या निर्णयाबाबत सचिन पायलट यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली असून सत्याला हैराण केलं जाऊ शकतं मात्र हरवलं जाऊ शकत नाही, असा संदेश दिला आहे.
Truth can be disturbed, cannot be defeated, tweets Sachin Pilot.
He has been removed as Rajasthan Deputy CM and state Congress chief. pic.twitter.com/JqjpMI9Uo2
— ANI (@ANI) July 14, 2020