नवी दिल्ली – हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदाचा महंमद मुश्ताक अहमद यांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता मणिपूरच्या ज्ञानेंद्रो निगोमबम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खरेतर राष्ट्रीय क्रीडा नियमावली व आचारसंहिता यांचा भंग केल्याने महंमद यांचे पद धोक्यात आले होते.
राजीनामा देताना आपण वैयक्तिक कारणाने हे पद सोडत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या आठवड्यातच त्यांनी राजीनामा सादर केला होता. त्यानंतर हॉकी इंडियाने बैठक घेत हा राजीनामा मंजूर केला. एक व्यक्ती एक पद तसेच ठरावीक काल मर्यादेत असलेली मुदत या नियमांचे उल्लंघन महंमद यांनी केले होते. 2 वर्षांपूर्वी त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.