सातारा -गेल्या काही दिवसापासून करोनाबाधित रुग्णांचे दररोज अर्धशतक सुरु आहे. मात्र शनिवारी 60 करोनाबाधितांनी करोनावर मात केल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. विविध रुग्णालयात आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 60 नागरिकांना शनिवारी दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
यामध्ये खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 34 व 28 वर्षीय पुरुष, 31, 75, 19 व 40 वर्षीय महिला, तांबेआळी येथील 50 वर्षीय पुरुष, चव्हाण आळी शिरवळ येथील 20 वर्षीय तरुण, शिंदेवाडी येथील 36 व 30 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील आशबी कंपनी येथील 21 वर्षीय तरुण, सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहुली येथील 50 वर्षीय पुरुष, अपशिंगे येथील 18 वर्षीय तरुण, करंजे येथील 40 वर्षीय पुरुष, खावली येथील 46 वर्षीय पुरुष, लिंब येथील 40 वर्षीय पुरुष.
पाटण तालुक्यातील चोपडी येथील 60 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील आगाशीवनगर येथील 32 व 24 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 62 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय महिला, वडगाव येथील 28 वर्षीय महिला, गोवारे येथील 24 वर्षीय पुरुष, कोयनावसाहत येथील 40 वर्षीय पुरुष, तारुख येथील 40, 60 वर्षीय पुरुष, खंडोबानगर मलकापूर येथील 33 वर्षीय महला, जखीनवाडी येथील 23 वर्षीय महिला, रुक्मिणीनगर येथील 39 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 22 व 26 वर्षीय पुरुष 70, 45 व 23 वर्षीय महिला, 32 वर्षीय ग्रामीण रुग्णालय कराड येथील आरोग्य सेविका, हजारमाची येथील 35 वर्षीय पुरुष, गोलेश्वर येथील 12 वर्षाचा बालक, 36 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच खटाव येथील 62 वर्षीय पुरुष, वाई तालुक्यातील सोनगीरवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, 55 व 27 वर्षीय महिला, 11 वर्षाचे बालक,
खानापुर येथील 49 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष,981 ब्राह्मणशाही येथील 72 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय महिला व 4 वर्षाचे बालक व 8 वर्षाची बालिका, सोनजी विहार बावधन नाका येथील 40 वर्षीय महिला, 20 व 16 वर्षीय तरुणी, शिरगांव येथील 31 वर्षीय पुरुष, खडकी येथील 53 वर्षीय पुरुष 42 वर्षीय महिला व 22, 17 व 15 वर्षीय तरुण, कोरेगाव तालुक्यातील तडवळे येथील 34 वर्षीय महिला व 6 वर्षांची बालिका अशा जिल्ह्यातील एकूण 60 जणांना शनिवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.