मुंबई – कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव रोखण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपट आणि टीव्ही मालिकांचे शूटिंग बंद असल्याने सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार आपल्या घरात बसून आहेत.
दरम्यान, या अशा परिस्थिती महाराष्ट्र पोलिस हे दिवसातील कित्येत तास काम करत होते. काम करताना कोरोनाची लागण देखील होऊ शकते याची त्यांना चांगली कल्पना असली, तरी त्यांनी आपले काम खूपच चांगल्याप्रकारे पार पाडले.आणि पुढे देखील करत आहे.
अश्याच खऱ्या हिरोंबरोबर मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता ‘सिद्धार्थ जाधव’ने सेल्फी काढत पोलीस अधिकाऱ्यांना सलाम केला. सिद्धार्थने हा सेल्फी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. दादर येथील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील हे अधिकारी आहेत.
सिध्यर्थ आपल्या पोस्ट म्हणतो कि, “आज मला खऱ्या हिरोंबरोबर सेल्फी काढायला मिळाला… दादरमध्ये शिवाजी पार्क पोलिस ठाण्यातील हे आपले पोलिस बांधव आपलं कर्तव्य बजावतायत… या सेल्फीच्या निमित्ताने तमाम मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांना मी मानाचा सलाम करतो”.