गोवा पर्यटकांसाठी खुले ; राज्य सरकारच्या ‘या’नियमांचे पालन करत पर्यटकांना मिळणार प्रवेश

गोवा : सध्या देशात लॉकडाऊनचा 5वा टप्पा सुरु असून देशात जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अशातच देशात लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली असून पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या गोव्यातही 2 जुलैपासून पर्यटन सुरु करण्यात आले आहे. गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी संदर्भात माहिती दिली. पर्यटकांना प्रवेश देण्यात येत असला तरी विदेशातील पर्यटकांना मात्र अद्याप गोव्यात प्रवेश मिळणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

गोव्याने पर्यटन खुल करण्याचे निश्चित केले असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी यांची घोषणा केली. राज्य सरकारने जारी केलेल्या एसओपीप्रमाणे चालू शकणाऱ्या 250 हॉटेल्सला पर्यटन विभागाकडून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गोव्यातील पर्यटन सुरु करण्याबाबत बोलताना गोव्याचे पर्यंटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी सांगितले की, ‘सध्या देशातील पर्यटकांना गोव्यातील पर्यटन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. विदेशातील पर्यटकांना परवानगी देण्यात आलेली नाही. देशातील पर्यटकांसाठी नियमावालीही निश्चित करण्यात आली आहे.

गोव्यात येण्यापूर्वी पर्यटकांना त्यांचे हॉटेलमधील राहण्याचे बुकिंग अगोदरच करावे लागणार आहे. त्यानंतर ते पर्यटन विभागाकडे परवानगीसाठी येईल. त्याचबरोबर पर्यटकांना गोव्यात दाखल होताना करोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागणार आहे. तसेच प्रमाणपत्र नसल्यास अशा पर्यटकांची चाचणी सीमेवरच करण्यात येणार आहे. त्यानंतर चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत राज्य सरकारच्या वतीने त्यांना क्वॉरंटाईन ठेवले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच ज्या पर्यटकांच्या करोना चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतील, त्यांना दोन पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यांना त्यांच्या मूळ राज्यात जाण्याची परवानगी दिली जाईल अथवा गोव्यातच उपचार घेण्याचा पर्यायही असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.